
>> नीलिमा प्रधान
अहंकार बाळगू नका
मेष – बुध, मंगळ युति, चंद्र गुरू त्रिकोणयोग. कोणतेही काम करताना अहंकार बाळगू नका. कायदा मोडेल असे कृत्य करू नका. व्यसन, मोह नुकसानकारक ठरेल. नोकरी टिकवा. धंद्यात समतोल राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य मुद्दे मांडा. शुभ दि. 15, 16
प्रगतीचा आलेख उंचावेल
वृषभ – चंद्र शुक्र लाभयोग, चंद्र बुध लाभयोग. प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. कामाचे योगय नियोजन करा. वेळेला महत्त्व द्या. चातुर्य वापरून ध्येय गाठा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारात वाढ होईल. कल्पकता वाढेल. शुभ दि. 19, 20
क्षुल्लक अडचणी येतील
मिथुन – चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला क्षुल्लक अडचणी येतील. कामावर लक्ष द्या. बुद्धिचातुर्याचा वापर प्रभावी ठरेल. प्रेरणादायक घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच योग्य ठरतील. शुभ दि. 19, 20
कामाचा व्याप वाढेल
कर्क – चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र शनि युती. सहनशिलता ठेवा. कठीण कामे योग्य पद्धतीने करा. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता बाळगा म्हणजे चुका टळतील. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 15, 19
कायद्याला धरून वागा
सिंह – बुध, मंगळ युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो कसोटीचा कालावधी आहे. गुप्त कारवाया होतील. तुमच्या हितसंबंधांत विष कालवण्याचा प्रयत्न होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून वागा. शुभ दि. 17, 21
व्यवहारात फसगत टाळा
कन्या – सूर्य हर्षल लाभयोग, शुक्र गुरू केंद्रयोग. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ वाद होतील. व्यवहारात फसगत टाळा. कायद्याला धरून भाष्य करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वादग्रस्त विधान नको. शुभ दि. 19, 20
नोकरीत दगदग होईल
तूळ – चंद्र, शुक्र लाभयोग, मंगळ गुरू त्रिकोणयोग. क्षुल्लक तणावावर मात करून यश मिळवावे लागेल. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा कामावर लक्ष द्या. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. वैर वाढवू नका. शुभ दि. 18, 21
कामाचा ताण वाढेल
वृश्चिक – चंद्र, मंगळ युती, शुक्र, गुरू केंद्रयोग. मैत्रीत, नात्यात गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या. नोकरीधंद्यात कामाचा ताण वाढेल. इतरांना मदत करण्यात वेळ कमी पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबाव वाढेल. मोठा निर्णय घेताना घाई नको. शुभ दि. 15, 19
प्रत्येक दिवस उत्साहाचा
धनु – बुध, मंगळ युती, चंद्र शुक्र लाभयोग. अनाठायी खर्च टाळा. प्रत्येक दिवस उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. किचकट काम रेंगाळत ठेऊ नका. नोकरीधंद्यात जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गजांचा परिचय होईल. शुभ दि. 18, 19
तडजोड करावी लागेल
मकर – चंद्र शुक्र लाभयोग, बुध मंगळ युती. आत्मविश्वासात भर पडणारी घटना घडेल. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमची स्तुती करतील. शुभ दि. 19, 20
रागावर ताबा ठेवा
कुंभ – चंद्र, शुक्र युती, चंद्र बुध लाभयोग. वाहनाचा वेग कमी ठेवा. साहित्याला नवा विषय मिळेल. नोकरीतील चुका सुधारून नव्याने जम बसवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क वाढवा. चर्चा करण्यात यश मिळेल. स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दि. 19, 20
प्रकृतीची काळजी घ्या
मीन – चंद्र, मंगळ युती, मंगळ गुरू त्रिकोणयोग होत आहे. ठरविल्याप्रमाणेच कामे होतील अशा भ्रमात राहू नका. नोकरीत दबाव राहील. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर तणाव राहील. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. 19, 21




























































