साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 1 जून 2025 ते शनिवार 7 जून 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – संवादचर्चेत लाभ

मेषेच्या पराक्रमात बुध, पंचमेषात मंगळ. सर्वच क्षेत्रांतील ताण-तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. नोकरीमध्ये दिग्गज व्यक्तींचा सहवास-प्रशंसा-बढती. धंद्यामध्ये  संवाद-चर्चा यात यश-लाभ. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभावी डावपेच टाकता येतील, बुद्धिचातुर्याचे कौतुक-लोकप्रियता वाढेल. विचारांना कलागुणांना चालना देणाऱया घटना घडतील. कठीण कामे करून घ्या. शुभ दि. 2, 3

वृषभ – करारामध्ये लाभ

वृषभेच्या धनेषात बुध, सुखेषात मंगळ. रागाच्या भरात केलेले वक्तव्य मैत्रीत-नात्यात गैरसमज, नाराजी निर्माण करेल. नोकरीमध्ये कामाचा व्याप. तरीही यश-प्रभाव. धंद्यात आळस नको. करारामध्ये लाभ. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभावी भाषण, मुद्दे वरिष्ठांना पटतील. प्रसिद्धी मिळेल. पद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात, वादात सावध राहा. घरगुती वातावरण गढूळ होईल. शुभ दि. 4, 5

मिथुन – चातुर्याने काम करा

स्वराशीत बुध, पराक्रमात मंगळ. मोठेपणाच्या नादाने अहंकार न ठेवता चातुर्याने, प्रेमाने कोणतेही किचकट काम करून घेता येईल. क्षुल्लक कारणावरून प्रतिष्ठेचा प्रश्न कुठेही निर्माण करू नका. नोकरीमध्ये सहनशीलता ठेवा. धंद्यात वाढ-लाभ. कठोर भाषा नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अनेकांच्या मनातील गैरसमज दूर करून मैत्रीपूर्ण नाते जोडता येईल. वरिष्ठांना कमी लेखू नका. शुभ दि. 1, 2

कर्क – व्यक्तीची पारख करा

कर्केच्या व्ययेषात बुध, धनेषात मंगळ. मोठेपणाच्या नादाने व्यवहारात-बोलण्यात कोणतीही चूक करू नका. अनेकांचे सहकार्य मिळवता येईल. नोकरीमध्ये इतरांच्या कामात मदत करावी लागेल. वर्चस्व राहील. धंद्यात हिशोब तपासा, गोड बोला. राजकीय-सामाजिक क्षेत्रात डावपेच टाकताना, मुद्दे मांडताना घाई नको. चूक टाळा. प्रतिष्ठा जपता येईल. योग्य-अयोग्य व्यक्तीची पारख करा. शुभ दि. 2, 3

सिंह – नोकरीत बढती

सिंहेच्या एकादशात बुध, स्वराशीत मंगळ. प्रत्येक दिवस महत्त्वाचा, यशाचा, उत्साहाचा ठरेल. किचकट कामे करून घ्या. रागाने फक्त वातावरण तापते तेव्हा चतुराईच उपयुक्त ठरेल. नोकरीत बढती-बदली. धंद्यात नवे कंत्राट-कराöलाभ-वसुली. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मुद्दय़ांचे कौतुक होईल. दौऱयात यश-भेट-चर्चा प्रभावी ठरेल. शुभ दि. 4, 5

कन्या – नोकरीत वर्चस्व राहील

कन्येच्या दशमेषात बुध, व्ययेषात मंगळ. कठोर बोलणे व राग यामुळे वातावरण गढूळ होईल. सुरळीत चाललेले काम रेंगाळेल. काळजी घ्या. वाहन हळू चालवा. नोकरीमध्ये काम वाढले तरी वर्चस्व राहील. मैत्रीत-नात्यात गैरसमज-वाद. धंद्यात आळस नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. परंतु स्पर्धा करणे, काडय़ा घालणे प्रकार संताप वाढवतील. शुभ दि. 5, 6

तूळ – सहनशील रहा

तुळेच्या भाग्येषात बुध. एकादशात मंगळ. अडचणी येतील. परंतु सहनशीलता ठेवा म्हणजे योग्य मार्ग शोधता येईल. नोकरीमध्ये मनाविरूद्ध कामे करावी लागतील. आपसांत गैरसमज-तणाव. धंद्यात नैराश्य वाटेल, पण वाट पाहा. बदल करण्याची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आरोप होईल. वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम विरोधक करतील. स्पर्धा कठीण आहे. शुभ दि. 1, 2

वृश्चिक – अहंकार ठेवू नका

वृश्चिकेच्या अष्टमेषात बुध, दशमेषात मंगळ. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. कुठेही थट्टा-मस्करी करताना सावध रहा. नात्यात-मैत्रीत तणाव. नोकरीमध्ये वर्चस्व राहील. अहंकार ठेवू नका. धंद्यात फसगत टाळा. इतरांच्या मोठेपणावर भाळून जाऊ नका. वसुली करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. परंतु विविध स्वभावाची माणसे सहवासात येतील. चर्चा किंवा करार करण्याची घाई नको. शुभ दि. 2, 6

धनु – धंद्यात नवी संधी

धनुच्या सप्तमेषात बुध, भाग्येषात मंगळ. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मान-अपमानाचा विचार न करता चातुर्याने वागा यश मिळवाल. नोकरीमध्ये क्षुल्लक ताण-तणाव-स्पर्धा. धंद्यात नवी संधी. वसुली करा. ठाम निर्णय लांबणीवर टाका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. अपप्रचार जास्त होईल तरीही काही व्यक्ती तुमच्या बाजूने राहतील. गुपित सांगतील. शुभ दि. 2, 4

मकर – योग्य सल्ल्याने निर्णय घ्या

मकरेच्या षष्ठेशात बुध, अष्टमेषात मंगळ. सप्ताहात संताप वाढवणाऱया घटना घडतील. तुमचे हितचिंतक संपले असा भास होईल. योग्य सल्ल्यानेच मोठा निर्णय घ्या. नोकरीत वर्चस्व परंतु तणाव वाटेल. धंद्यात फसगत टाळा. शब्द फिरवणारी माणसे सहवासात येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. शत्रू मैत्रीची भाषा करेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. 1, 5

कुंभ – विसंबून राहू नका

कुंभेच्या पंचमेषात बुध, सप्तमात मंगळ, परिस्थितीनुसार तुम्हाला कामात बदल करण्याची येईल. ताण-तणाव वाढेल. निश्चित धोरण ठरवणे कठीण होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. नोकरीमध्ये किचकट कामे करून दाखवाल. कौतुक होणे कठीण. धंद्यात वाढ-दगदग-विलंब. राजकीय-सामाजिक क्षेत्रात व्यक्ती अचानक शब्द फिरवण्याची शक्यता. जवळच्या व्यक्ती समजून घेतील. दुसऱयांवर विसंबून राहू नका. शुभ दि. 2, 3

मीन – वेळेला महत्त्व द्या

मीनेच्या सुखस्थानात बुध, षष्ठेशात मंगळ. अडचणींवर मात करून महत्त्वाची कामे करून घेता येतील. आळस नको. वेळेला महत्त्व द्या. प्रत्येक ठिकाणी तत्परता ठेवा. नोकरीत वर्चस्व-कौतुक-वाढ. नवा बदलाचा विचार. धंद्यात वाढ. नवे धोरण ठरवाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मुद्दे महत्त्वाचे ठरतील. वरिष्ठ खूश होतील. मोठे पद मिळेल. नवीन परिचय उत्साहवर्धक. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल. शुभ दि. 1, 4