>> नीलिमा प्रधान
मेष- कामात चूक टाळा
मेषेच्या सप्तमेषात बुध, अष्टमेषात शुक्र. क्षेत्र कोणतेही असो वागण्याबोलण्यात नम्रता, संयम बाळगा. समस्या वाढणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून वक्तव्य करा. कामात चूक टाळा. धंद्यात अरेरावीने नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ, दगदग वाढेल. तुमच्या मुद्दय़ांना उशीरा प्र्रतिसाद मिळेल.
शुभ दिनांक ः 10, 11
वृषभ- गैरसमज होतील
वृषभेच्या षष्ठेशात बुध, सप्तमेषात शुक्र. अनाठायी खर्च टाळा. क्षुल्लक कारणाने समस्या वाढून वेळ फुकट जाईल, सावध रहा. महत्त्वाची कामे याच सप्ताहात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत महत्त्वपूर्ण काम कराल. मैत्रीत गैरसमज होतील. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट, वादग्रस्त कामे प्रथम पूर्ण करा.
शुभ दिनांक ः 7, 12
मिथुन- संयम बाळगा
मिथुनेच्या पंचमेषात बुध, षष्ठेशात शुक्र. रागावर नियंत्रण ठेवून सर्व कामे करा. अहंकाराने वैर वाढेल. बुद्धिचातुर्याचा वापर करा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत व्याप वाढतील. धंद्यात तत्परता ठेवा. आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय झाल्याने त्रस्त व्हाल. दूरदृष्टिकोन ठेवा. संयमाने प्रश्न सोडवता येतील.
शुभ दिनांक ः 9, 10
कर्क- प्रवासात सावध रहा
कर्केच्या चतुर्थेशात बुध, पंचमेषात शुक्र. क्षुल्लक समस्येचा बाऊ न करता कामे करा म्हणजे जास्त यश मिळेल. प्रवासात सावध रहा. वैर वाढवू नका. नोकरीत कामाचे कौतुक होईलच या भ्रमात राहू नका. प्रभाव राहिल. धंद्यात वाढ होईल. ताणतणाव जाणवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारीने वागावे लागेल. प्रतिष्ठा लाभेल.
शुभ दिनांक ः 7, 12
सिंह- प्रगतीकारक बदल होईल
सिंहेच्या पराक्रमात बुध, चतुर्थात शुक्र. क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करू नका. अनेक चांगली कामे करता येतील. नोकरीत प्रगतीकारक बदल होतील. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. कर्जाचे काम करा. नवीन परिचयावर भाळू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विचारवंतांच्या सहवासाने उत्तम योजना तयार करता येतील.
शुभ दिनांक ः 9, 10
कन्या- यशाचा डंका वाजेल
कन्येच्या धनेषात बुध, पराक्रमात शुक्र. प्रत्येक दिवस यशाचा ठरेल. किचकट, कठीण कामे करून घ्या. तुमच्या यशाचा डंका चौफेर वाजेल. नोकरीत उत्तम बदल होईल. धंद्यात नवे धोरण यशस्वी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबरदस्त प्रभाव राहील. लोकप्रियता लाभेल. जनतेच्या हिताची कामे करा. कौटुंबिक वाटाघाटीत लाभ होईल.
शुभ दिनांक ः 8, 12
तुळ- धंद्यात सतर्क रहा
स्वराशीत बुध, तुळेच्या धनेशात शुक्र. उत्साह, आत्मविश्वास काबूत ठेवा. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही वक्तव्य करू नका. गैरफायदा घेणारे लोक ओळखा. नोकरी टिकवा. धंद्यात सतर्क रहा. हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. प्रवासात दौऱयात काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 9, 10
वृश्चिक- प्रत्येक दिवस यशस्वी
वृश्चिकेच्या व्ययेषात बुध, स्वराशीत शुक्र. प्रत्येक दिवस यशस्वी ठरवता येईल. आळसाने नुकसान होईल. मैत्री टिकवणे कष्टाचे होईल. नोकरीत वर्चस्व मिळेल. इतरांना मदत करण्याने दमछाक होईल. प्रवासात काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे याच सप्ताहात पूर्ण करा. मुद्दे मांडताना चूक नको.
शुभ दिनांक ः 10, 11
धनु- प्रतिस्पर्धी वाढतील
धनुच्या एकादशात बुध, व्ययेषात शुक्र. सप्ताहाच्या सुरुवातीला ताणतणाव, गैरसमज होतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. प्रतिस्पर्धी वाढतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही चूक करू नका. मौल्यवान वस्तू जपा. धंद्यात संयम ठेवा. नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक जवळच्या व्यक्ती नाराजी व्यक्त करतील.
शुभ दिनांक ः 11, 12
मकर- करारात सावध रहा
मकरेच्या दशमेषात बुध, एकादशात शुक्र. विरोधकांना उत्तरे देताना भान विसरू नका. प्रमाणाबाहेर उत्साह, आत्मविश्वास घातक ठरतो. प्रतिष्ठा, लोकप्रियता जपता येईल. नोकरीत मेहनत घ्यावी लागेल. कौतुक होईल. करारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. कार्यात प्रगती कराल.
शुभ दिनांक ः 8, 12
कुंभ- कायद्याला धरून वागा
कुंभेच्या भाग्येषात बुध, दशमेषात शुक्र. मानसिक तणाव राहील. प्रकृतीची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तींची नाराजी होऊ शकते. नोकरी टिकवा. धंद्यात अरेरावी नको. कायद्याला धरून वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर तणाव जाणवेल. वाद, समस्या यामुळे त्रस्त राहाल. सहनशीलता ठेवा. अपमानास्पद शब्द ऐकावे लागतील.
शुभ दिनांक ः 7, 9
मीन- रागावर ताबा ठेवा
मीनेच्या अष्टमेशात बुध, भाग्येषात शुक्र. अतिमहत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात तेजी टिकवणे कष्टाचे राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भेट, चर्चा यात चांगले यश मिळेल. ज्ञानात भर पाडणारे मुद्दे मिळतील. प्रतिष्ठा वाढेल. पद मिळेल. कौटुंबिक कामे वेळीच संपवा.
शुभ दिनांक ः 10, 12