इंग्लंडने मंजुरी दिल्यास वेस्ट इंडिजचा संघ दौरा करणार, उभय देशात 3 कसोटी सामने होण्याची शक्यता

963

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेऊन हे सामने खेळवण्यात येतील. असं असलं तरी या दौऱ्यासाठी इंग्लंड सरकारकडून परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी मिळाली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना पुन्हा एकदा सुरुवात होणं शक्य होईल. कोरोनाच्या उद्रेकामुळे क्रीडाविश्वही प्रभावित झालं असून सध्या एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जात नाहीये.

वेस्ट इंडीजच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलंय की इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाशी संलग्न मंडळींनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या संबंधित मंडळींशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी परवानगी दिली.

कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार 8 जुलै पासून हे सामने सुरू व्हावेत असं म्हटलं आहे. हँपशायरमधील एजेस बाऊल आणि लँकेशायरचं ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानात हे सामने खेळवावेत असंही प्रस्तावात म्हटलं आहे. मैदान आणि हॉटेल जवळ असल्याने ही मैदाने निवडण्यात आली आहे. हे सामने झाले तर ते प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या