भाजीपाला ताजा ठेवण्यासाठी काय कराल? हे करून पहा

भाजीपाला लवकर खराब होऊ नये यासाठी काही टिप्स. सर्वात आधी शक्यतो भाज्या थंड ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे त्या खराब होत नाहीत. फ्रीजमधील ड्रॉवर हे भाज्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. भाज्या नेहमी हवाबंद पंटेनर किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवाव्यात.

कांदे, बटाटय़ासोबत भाज्या एकत्र ठेवल्यास लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे ते वेगवेगळे ठेवावेत. पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी धुऊन कोरडय़ा कराव्यात. पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून सीलबंद पिशवीत ठेवाव्यात. भाज्या कापून ठेवायच्या असतील तर त्या काळ्या पडू नये यासाठी लिंबाचा रस त्यावर पिळल्यास भाज्या ताज्या राहतात.