
1 पॅन कार्ड एक महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे. आधार आणि पॅन आता लिंक करणे सक्तीचे आहे. त्यामुळे दोन्ही दस्तावेजांवरील नाव समान असले पाहिजे.
2 पॅन कार्डवरील नावात दुरुस्ती करणे सोपे आहे. www.incometax.gov.in या आयकर खात्याच्या वेबसाईटवर जा. तेथे तुमचा पॅन क्रमांक टापून लॉगिन करा.
3 तेथे पॅन कार्ड करेक्शनचा पर्याय निवडा. तेथे तुम्हाला मागितलेली माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. माहिती भरताना त्यांचे नाव यावेळी अचूक भरा.
4 हा फॉर्म सबमिट करताना तुम्हाला 106 रुपयांचे शुल्क भरावे लागेल. ते भरून फॉर्म सबमिट करा. काही दिवसांनी तुमचे सुधारित पॅन कार्ड घरपोच मिळेल.
5 याशिवाय जवळच्या पॅन सुविधा केंद्रात जाऊन पॅन दुरुस्तीचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे देऊन शुल्क भरा. काही दिवसांमध्ये सुधारित पॅन कार्ड घरपोच मिळेल.





























































