असं झालं तर… बँक खात्यात ‘‘ऑटो पे’ सेट केलंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण ईएमआय, वीज बिल, इन्शुरन्स प्रीमियम आदींच्या पेमेंटसाठी ऑटोमॅटिक पेमेंटचा पर्याय निवडतो. एका निश्चित तारखेला खात्यातून आपोआप पेमेंट होते.

ऑटो पे मोड निवडताना काळजी घेतली पाहिजे. तुम्ही नेमकी किती रकमेसाठी सूचना देत आहात आणि ही रक्कम किती वेळा वजा केली जाईल ते पहा.

ऑटो पेसाठी केवळ बँकेचे अधिकृत अॅप किंवा विश्वसनीय वेबसाईट वापरा. स्थायी सूचनांसाठी कोणतीही अज्ञात वेबसाईट किंवा अॅप वापरू नका.

स्वयंचलित पेमेंटचा अर्थ असा नाही की, आपण आपले खाते पाहणे थांबवता. आपल्या खात्यातून किती रक्कम वजा होत आहे हे वेळोवेळी तपासत रहा.

तुम्हाला असा एखादा व्यवहार दिसला, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, त्याकडे  दुर्लक्ष करू नका, ताबडतोब तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि ती स्थायी सूचना बंद करा.