
डेबिट कार्ड चोरीला गेले किंवा प्रवासात हरवले तर घाबरून जाऊ नका. सर्वात आधी ज्या बँकेचे कार्ड आहे, त्या बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
कार्डला तत्काळ ब्लॉक करण्याची विनंती करा. कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुमचा एटीएम नंबर, बँक खाते क्रमांक तसेच वैयक्तिक माहिती विचारली जाऊ शकते.
बँकेच्या होम ब्रँचमध्ये जाऊनही कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करू शकता. बँक अधिकारी कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील.
नेट बँकिंगवरूनही कार्ड ब्लॉक करता येऊ शकते. नेट बँकिंग पोर्टलवर जाऊन एटीएम कार्ड ब्लॉक किंवा एटीएम कार्ड ब्लॉक असा पर्याय दिसेल.
हरवलेले किंवा चोरीला गेलेले डेबिट कार्ड ब्लॉक करण्यात आल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन नवीन कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.