असं झालं तर… फ्लॅटची कागदपत्रे हरवल्यास काय करावे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमची मालमत्ता असलेल्या फ्लॅटची कागदपत्रे हरवल्यास किंवा त्यात कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास कायदेशीर पावले उचला. यासाठी अजिबात उशीर करू नका.

सर्वप्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन कागदपत्रे हरवल्याची तक्रार दाखल करा. तक्रारीत कधी, कुठे आणि कशी हरवल्याचा स्पष्ट उल्लेख करा.

गुन्हा दाखल केल्याची प्रत सांभाळून ठेवा. नवीन कागदपत्रे बनवताना याची गरज लागते. हरवलेल्या कागदपत्रांबाबत स्थानिक वृत्तपत्रांत जाहिरात द्या.

स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र तयार करा. यात कागदपत्रे हरवल्याची हकिगत नोंदवा. यावर नोटरी करून घ्या. फ्लॅट असल्यास सोसायटीकडून एनओसी घ्या.

 कागदपत्रे बँकेत असल्यास बँकेकडे लेखी तक्रार दाखल करा. जर मालमत्तेवरून वाद निर्माण झाला असेल तर वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करा.