असं झालं तर… गुगल अकाऊंट हॅक झाले तर

1 गुगल अकाऊंट हॅक होणे हि चिंताजनक बाब आहे मात्र वेळेत पावले उचलल्यास अकाऊंट सुरक्षितपणे परत मिळवू शकता.
2 हॅकरने तुमचा पासवर्ड बदलला असेल तर गुगलच्या अधिकृत अकाऊंट रिकव्हरी पेजवर जा.
3 तिथे इमेल आयडी टाकून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (उदा. जुना पासवर्ड, रिकव्हरी फोन नंबर किंवा इमेल)
4 लॉगइन केल्यानंतर त्वरीत पासवर्ड बदला पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हांचा वापर करा.
5 रिकव्हरी फोन आणि रिकव्हरी इमेल बरोबर असल्याची खात्री करा व ओळखीचा नसलेला नंबर तेथून त्वरीत काढून टाका.