
दररोज व्यवस्थित ब्रश करूनही जर तोंडाचा वास येत असेल तर हे आरोग्यासाठी हानिकारक आहेच, परंतु चारचौघात लाजिरवाणेदेखील आहे. तोंडाचा वास येण्याची अनेक कारणे असू शकतात. हिरडय़ांचे आजार, जिभेवर दुर्गंधी करणारे जिवाणू, विशिष्ट पदार्थांचे सेवन, तंबाखू व बिडीमुळे वास येऊ शकतो.
दही खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी कमी होते. जास्त फायबर असलेल्या भाज्या खा. ब्लॅकबेरी, लिंबूसारख्या पदार्थांचे सेवन करा. ओवा चघळल्यानेसुद्धा दुर्गंधी कमी होते. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. तोंड कोरडे होणार नाही याची काळजी घ्या. काकडी, गाजर, केळी, सफरचंद खा. जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा.