
जर तुमचे क्रेडिट कार्ड खराब झाले असेल तर अनेकदा ते मशीनमध्ये स्वीकारले जात नाही. अशा वेळी कार्ड त्वरित ब्लॉक करणे/नव्या कार्डसाठी अर्ज करणे गरजेचे ठरते.
नवीन कार्ड मागवण्याआधी खराब झालेल्या क्रेडिट कार्डला ताबडतोब ब्लॉक करा. त्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क साधावा किंवा संबंधित बँकेच्या अॅपवरून ऑनलाइनही ते करता येते.
नव्या कार्डसाठी बँकेच्या अॅपमधील ‘सर्व्हिस रिक्वेस्ट’मध्ये जा, ‘रिक्वेस्ट रिप्लेसमेंट कार्ड’ हा पर्याय निवडावा. त्यासाठी लागणारे शुल्क आणि बँकेकडे नोंदवलेला पत्ता योग्य आहे का, हे तपासावे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ई-मेल/एसएमएसद्वारे ट्रॅकिंग लिंक दिली जाते. बँकेकडून रेफरन्स नं. पुरवला जातो. पाच ते सात दिवसांत रिप्लेस केलेले क्रेडिट कार्ड मिळते.
कार्ड रिप्लेस करण्यासाठी आकारण्यात येणारी फी साधारणतः 100 ते 250 रुपयांच्या दरम्यान असते, तसेच त्यावर जीएसटीही आकारला जाऊ शकतो.





























































