
1) मोबाईल आणि संगणक या उपकरणांच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास होतो. थोडी काळजी घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल.
2) दर 20 मिनिटांनी 20 सेपंदाचा ब्रेक घेऊन किमान 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या ठिकाणी पाहिल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो.
3) डोळ्यांपासून मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनचे अंतर हे 20 ते 24 इंच असावे. स्क्रीन थोडी तिरपी ठेवावी, जेणेकरुन चकाकी आणि परावर्तनाचा त्रास कमी होतो.
4) स्क्रीनचा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट यामध्ये संतुलन ठेवा. स्क्रीनचा ब्राईटनेस सभोवतालच्या प्रकाशाशी सुसंगत असावा. जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही.
5) स्क्रीनकडे पाहताना अधूनमधून डोळे मिचकावत जा. तसेच अर्धा ते पाऊणतास काम केल्यानंतर डोळ्यांना 4-5 मिनिटे आराम द्यावा.


























































