असं झालं तर… अचानक आलेल्या पावसात फोन ओला झाला तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे. अचानक आलेल्या पावसात तुमचा मोबाईल फोन ओला झाला तर? मोबाईल फोन ओला झाल्यास टेन्शन वाढते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शक्य झाल्यास एखादे वॉटरप्रूफ पाऊच नेहमी सोबत ठेवा. अचानक पाऊस सुरू झाल्यास पाऊचमध्ये फोन सुरक्षित राहिल.

महत्त्वाचे म्हणजे, फोनचा चार्ंजग पोर्ट आणि हेडफोन जॅक सुरक्षित ठेवा. फोनचा डिस्प्ले तसेच बॉडीच्या गॅपमधून आत पाणी जाऊ शकते. त्यामुळे चांगले टेम्पर्ड ग्लास वापरा.

फोन ओला झालाच, तर सर्वप्रथम फोन बंद करा. फोनमधून सिमकार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढून ठेवा. चुकुनही लगेच फोन सुरू किंवा चार्ंजगला लावू नका.

कोरडे कापड किंवा टिश्यू पेपरने फोन पुसून घ्या. हेअर ड्रायरचा वापर करु नका. काही तास फोन कोरडा होईपर्यंत एका उष्ण ठिकाणी ठेवा.