बुटाचा वास येऊ नये म्हणून

 

– बऱयाचदा बूट घातल्यानंतर घाण वास येतो. यामुळे बाजूला बसलेल्या व्यक्तीला त्रास होतो.असे होऊ नये म्हणून सर्वात आधी स्वच्छ आणि कोरडे मोजे घाला. बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी, कमी करण्यासाठी हे काही उपाययोजना करता येतील.

– बूट वापरल्यानंतर त्यांना हवा लागली पाहिजे, याची काळजी घ्या. बुटांमध्ये ड्रायर शीट ठेवून रात्रभर ठेवल्यास ओलावा आणि वास शोषला जातो. कापसाच्या बोळ्यावर टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून बुटात ठेवल्यास वास आणि बॅक्टेरिया कमी होतात. बुटाला स्वच्छ आणि सुती कपडय़ाने दररोज स्वच्छ करा. त्यामुळे बुटामधून वास येणार नाही.