
- मुंबईत लोकलने प्रवास करताना अनेकदा तिकीट काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण विनातिकीट प्रवास करतात.
- जर तुम्हाला विनातिकीट लोकल प्रवास करताना टीसीने पकडले, तर तुम्हाला नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
- रेल्वेच्या कायद्यानुसार, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला यावर दंड आकारला जातो.
- तुमच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
- विनातिकीट प्रवास केल्यास गुपचूप दंड भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात हजर केले जाईल. विनातिकीट प्रवास करणे टाळावे.