व्हाट्सअपने कारवाईचा बुलडोझर फिरवला; 70 लाख हिंदुस्थानी अकाऊंट केले बंद, तुम्हीही ‘ही’ चूक करताय?

व्हाट्सअप हे आता जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मुलांच्या शाळेतील ग्रुप असो किंवा कामाच्या ठिकाणचे ग्रुप असो, मेसेजच्या देवाण-घेवाणीसाठी सर्वाधिक वापर व्हाट्सअपचाच होतो. पण आता व्हाट्सअपने मोठी कारवाई करत जवळपास 70 हिंदुस्थानी अकाऊंटवर कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे. व्हाट्सअपने ही अकाऊंट बंद केल्याने युजर्सला त्याचा वापर करता येणार नाही. यातील बहुतांश अकाऊंट ही सायबर फ्रॉड आणि स्कॅमशी संबंधित असून काहींनी व्हाअट्सअपच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे.

व्हाट्सअपने एक अहवाल सादर केला आहे. मेटाच्या या मेसेजिंग अॅपने 71 लाख हिंदुस्थानी अकाऊंट बंद केली आहेत. 1 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या महिन्याभरात ही कारवाई करण्यात आली आहे. या युजर्सने व्हाट्सअपचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

व्हाट्सअपने एकूण 71 लाख 82 हजार अकाऊंट बंद केले आहेत. कंपनीचे अत्याधुनिक मशीन लर्निंग आणि डेटा एनालिसीसचे काम करते. याद्वारे संशयित अकाऊंटची ओळख पटवली जाते. व्हाट्सअपचे हिंदुस्थानसह जगभरात अब्जावधी युजर्स आहेत. याद्वारे मेसेज, ऑडिओ, व्हिडीओ, कॉलिंग आणि पैसे पाठवण्याच्या सेवेचाही लाभ घेता येतो.

व्हाट्सअप आपल्या प्लॅटफॉर्मला सुरक्षित ठेवण्यासाठी काही युजर्सवर कठोर कारवाई करते आणि त्यांच्यावर बंदी घातले. यामागे अनेक कारणं आहेत. कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन, स्पॅम, स्कॅम यासह चुकीची माहिती शेअर करणे, दोन धर्मात तेढ होईल असा मजकूर शेअर करणे किंवा युजरकर्त्याला नुकसान होईल असा कंटेंट शेअर करणे यासारख्या गोष्टींचा समावेशआहे. यासह काही देशांच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यासही व्हाट्सअप कारवाई करते.