व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर जाहिराती दिसणार

व्हॉट्सअ‍ॅपवर कुणाचे स्टेटस बघणार असाल, तर आता तिथे जाहिराती बघण्याची तयारीही ठेवावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटनुसार, आता स्टेटस आणि चॅनेल्समध्येसुद्धा जाहिराती दिसतील.  मेटा पंपनीनेही याला दुजोरा दिला आहे. मेटाच्या नव्या पॉलिसीअंतर्गत युजर्सला अ‍ॅपमध्ये संबंधित जाहिराती दिसतील. मात्र चॅटिंग, कॉल्स किंवा स्टेटसची प्रायव्हसी पहिल्यासारखी सुरक्षित राहील. पंपनीच्या मते या जाहिराती फक्त अपडेट्स टॅबमध्ये दिसतील.  मेटा पंपनीने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेय की, आता युजर्सला स्टेटस आणि चॅनेल सेक्शनमध्ये रिलेवंट अ‍ॅड्स दिसतील. युजर्सला चांगला अनुभव मिळावा, हा यामागील उद्देश आहे.

पर्सनल चॅट, सुरक्षेवर परिणाम नाही

व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलेय की, युजर्सचे पर्सनल चॅटिंग, कॉल्स आणि स्टेटस सुरक्षित राहतील. थर्ड पार्टी किंवा जाहिराती दाखवण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जाणार नाही. जाहिराती केवळ अपडेट्स टॅबमध्ये दिसतील. पर्सनल चॅटमध्ये नाही.

नव्या फीचरसोबत व्हॉट्सअॅपने अपडेट टॅब प्रायव्हेट पॉलिसी आणि टर्म्स अपडेट केले आहे. पंटीन्यूचे बटण दाबून युजर्सला नवे नियम स्वीकारावे लागतील. जर युजर्सची सहमती नसेल तर नॉट नाऊचा पर्याय आहे.