Video – ही घटना खरोखर इंद्रायणी एक्सप्रेसमधील आहे ?

2813

सोमवारी व्हॉटसअॅपवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओसोबतच्या तपशीलात म्हटले आहे की हा व्हिडीओ मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेसमधील असून हा प्रकार कळवा आणि ठाण्याच्या मध्ये पारसिक बोगद्यात झाला आहे. मात्र खरा प्रकार वेगळा असून त्याबाबत मध्य रेल्वेने एक माहिती प्रसारीत केली आहे.

मध्य रेल्वेने जी माहिती दिली आहे त्यात म्हटले आहे की

  • सदर दृश्ये रेल्वेच्या डब्यातील सीसीटीव्हीने टीपलेली आहे, इंद्रायणी एक्सप्रेसच्या डब्यात सीसीटीव्ही बसवलेले नाहीत
  • ही दृश्ये इंद्रायणी एक्सप्रेसच्या C2 या डब्यातील असल्याचे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले असून, इंद्रायणी एक्सप्रेसच्या C2 डब्यातील आतील भागाची रचना अशा प्रकारची नाही
  • इंद्रायणी एक्सप्रेस ठाण्याला रात्री 9.30 वाजता येते, व्हिडीओमध्ये या ट्रेनची वेळ रात्री 10.40 ची दाखवण्यात आली आहे.
  • व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय की ही ट्रेन पारसिकच्या बोगद्यात असताना हा प्रकार घडला आहे, प्रत्यक्षात या बोगद्यात वेगमर्यादा नाहीये.
  • बोगदा आणि ट्रेनमधील अंतर हे पारसिकच्या बोगद्याप्रमाणे नाहीये
  • आरोपीने थंडीपासून बचाव करणारे कपडे घातलेले असून हे मुंबई पाहायला मिळत नाही
  • या संदर्भात रेल्वे पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
आपली प्रतिक्रिया द्या