
जेव्हा जेव्हा मी सरकारविरोधात बोलते तेव्हा माझ्या पतीला इन्कम टॅक्सची नोटीस अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. तसेच अजित पवार यांच्यावरही सुळे यांना भाष्य केले.
आज सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की जेव्हा जेव्हा मी सरकारविरोधात बोलते तेव्हा तेव्हा माझे पती सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस येते. लोकसभेत अर्थसंकल्पावर मी टीका केली होती, तेव्हाही नोटीस आली होती. या नोटीसीला मी प्रेमपत्र म्हणते, आताही हे पत्र आले असेल. मी लोकसभेत किती वेळा बोलले आणि किती वेळा नोटीस आल्या याची आकडेवारीच मी फेसबुकवर टाकणार आहे, असे सुळे म्हणाल्या.
लाईव्ह |📍सोलापूर | पत्रकारांशी संवाद
13-08-2024
https://t.co/fNEwFv59QK— Supriya Sule (@supriya_sule) August 13, 2024
लाडकी बहीण नाराज?
माझी बहीण दुरावली झाली असे विधान अजित पवार यांनी केले. त्यावर सुळे म्हणाल्या की नाती या टीव्हीवर बोलायचा विषय नसतो. मनात ठेवून ती निभवायची असतात, ही टीव्ही मालिका नाही हे माझं आयुष्य नाही. त्याचा तमाशा करायला मला आवडत नाही. नाती या फक्त रक्ताची नसतात प्रेमाचीही असतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माझे नाते आहे असेही सुळे म्हणाल्या.