
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, मैदानातील त्याच्या कामगिरीसोबतच सध्या त्याची ‘लव्ह लाईफ’ सोशल मीडियावर जोरात चर्चेत आली आहे. ईशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, ईशान आणि मॉडेल आदिती हुंडिया एकमेकांना डेट करत आहेत.
गेल्या काही काळापासून ईशान आणि मॉडेल आदिती यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. दरम्यान आता कुटुंबाकडून या वृत्ताला दुजोरा मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडिय़ावर ईशानवर शुभेच्छांचा वर्षावर होताना दिसत आहे.
कोण आहे Aditi Hundia?
जयपूरची रहिवासी असलेली आदिती हुंडिया ग्लॅमर जगतातील एक ओळखीचा चेहरा आहे. 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिलेल्या आदितीने 2018 मध्ये ‘मिस दिवा’ स्पर्धेतही मोठे यश मिळवले होते. केवळ सौंदर्यच नव्हे, तर आपल्या आत्मविश्वासाने तिने फॅशन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदिती एक यशस्वी मॉडेल आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर असून सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत तिने काम केले आहे.
ईशान किशन यशाच्या शिखरावर असतानाही आदिती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. आयपीएल असो वा आंतरराष्ट्रीय सामने, आदिती अनेकदा स्टेडियममध्ये ईशानला प्रोत्साहन देताना दिसली. सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर प्रेमळ कमेंट्स करणे असो वा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणे, या जोडीने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ईशानच्या आजोबांच्या वक्तव्यानंतर आता हे कपल आपल्या नात्याला अधिकृत घोषणा कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहेत.




























































