‘धुरंधर’ हा एक अद्भुत अनुभव आहे, असे प्रियांका चोप्रा का म्हणाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी “धुरंधर: द रिव्हेंज” या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले. तिने आदित्य धर याचेही यावेळी कौतुक केले आहे. आदित्य धर बद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, एका ध्येयाने प्रेरित झालेला माणूस असून धुरंधर हा सर्वार्थाने एक अद्भुत अनुभव आहे. प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि “दिल धडकने दो”, “गुंडे” व “बाजीराव मस्तानी” या चित्रपटांमधील तिचा सहकलाकार रणवीर सिंहचे विशेष कौतुक केले.

रणवीर सिंहबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “अभिनंदन माझ्या मित्रा @ranveersingh,” तिने चित्रपटातील इतर कलाकारांनाही टॅग केले. यात अर्जुन रामपाल, आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांचा समावेश आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ने सर्वांना खिळवून ठेवले असून, या चित्रपटाचे बाॅलिवुडमध्येही खूप कौतुक करण्यात येत आहे. प्रियांकाने या चित्रपटाबद्दल लिहिताना म्हटले की, चित्रपट पाहिल्यानंतर ती आनंदी आणि आश्चर्यचकित झाली. या चित्रपटानंतर विकीने रणवीर सिंहचेही कौतुक केले. त्याने लिहिले, “रणवीर सिंग, तू मला नेहमीच प्रेरणा देतोस. एक अभिनेता म्हणून तुझी कला आणि शैली अप्रतिम आहे. विकीने शिवकुमारच्या एडिटिंगला आतापर्यंत पाहिलेल्यांपैकी सर्वोत्तम म्हटले आहे आणि संगीतकार सचदेव यांचा आपण चाहता असल्याचेही जाहीर केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन करत विकीने लिहिले, “जिओ स्टुडिओ, ज्योती देशपांडे, लोकेश धर आणि बी६२ स्टुडिओ यांचे अभिनंदन. संपूर्ण टीमने अप्रतिम काम केले आहे. तुम्ही सर्व खऱ्या अर्थाने ‘धुरंधर’ आहात.”