बंगालमध्ये SIR प्रक्रिया इतर राज्यांपेक्षा वेगळी का? ममता बॅनर्जी यांचा पत्राद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. त्यांनी राज्यातील मतदार यादीच्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असा आरोप केला आहे की, बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेचे नियम इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. ममतांनी निरीक्षकांच्या नियुक्तीपासून ते कागदपत्रांच्या तपासणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बंगालमधील प्रक्रिया संवैधानिक आणि लोकशाही प्रक्रियेनुसार चालेल याची खात्री निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, जेव्हा देशभरात एकसारखे कायदे आणि नियम आहेत, तेव्हा बंगालमध्ये ते वेगळ्या पद्धतीने का अंमलात आणले जात आहेत? त्यांनी पत्रात लिहिले की, “वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने अंमलात आणली जात आहे हे अत्यंत चिंताजनक आहे.”

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला थेट सांगितले आहे की, त्यांनी बंगालकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे थांबवावे. त्यांनी एसआयआर प्रक्रिया संवैधानिक आणि लोकशाही पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.