महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा का झाली नाही? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं कारण…

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जम्मू-कश्मीर आणि हरयाणातील विधानसभा निवणुकीची घोषणा केली. जम्मू-कश्मीरमध्ये तीन टप्प्यात, तर हरयाणात एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडेल. यासोबतच महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोग आज निवडणुकीची घोषणा करेल अशी आशा होती. मात्र तसे काही घडले नाही. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरणही दिले.

जम्मू-कश्मीर आणि हरयाणात एकाचवेळी निवडणूक होईल. मात्र महाराष्ट्रातील सध्याच वातावरण पाहता निवडणूक नंतर घेतली जाईल. महाराष्ट्रात मतदार याद्या अपडेट करण्याचे काम अद्याप बाकी आहे. यासह पावसाचे वातावरणही असून त्यानंतर पितृपक्ष, गणेशोत्सव आणि दिवाळी यासारखे मुख्य सण आहेत, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या मॉन्सून सक्रिय आहे. तसेच एकामागोमाग एक मुख्य सण येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही.

जम्मू-कश्मीर आणि हरयाणात एकाच वेळी निवडणूक घेतली जाईल. मात्र महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पाहता निवडणूक नंतर घेतली जाईल. सध्या मॉन्सून सक्रिय असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे. यासह पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी यासारखे सण असून यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊ शकते, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

Assembly Election – कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक, तीन टप्प्यात होणार मतदान

राज्यघटनेनुसार विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावर पुढील 6 महिन्यात कधीही निवडणूक घेतली जाऊ शकते. हा निवडणूक आयोगाचा विशेषाधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.