
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील प्रमुख चेहरा निलेश साबळे आता लवकरच आपल्याला नव्या भूमिकेत दिसणार आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे प्रेक्षकांचे आवडते कलाकार, नव्या पर्वात नव्हते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. कामांमध्ये बिझी आहोत, असं डिप्लोमॅटीक उत्तर दोघांनीही दिलेलं होतं. परंतु आता येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राचा हा आवडता सूत्रसंचालक नव्या कार्यक्रमासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा नवा कार्यक्रम कोणत्या वाहिनीवर असणार आहे हे मात्र अजून गुलदस्त्यामध्ये आहे.
View this post on Instagram
नुकतीच निलेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन, नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. निलेशनं शेअर केलेल्या पोस्टमधून त्याने नव्या कार्यक्रमाचे नाव जाहीर केले आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धूरा निलेशच्या खांद्यावर असून, या कार्यक्रमाचे नाव ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ असे आहे.
“महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो…”, अशी पोस्ट त्याने केलेली आहे. या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्याला नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा अनेकांनी दिलेल्या आहेत.


























































