Wimbledon 2025 – यानिक सिनर नवा ‘विंबल्डॉन’, अल्काराजचा विजयरथ रोखला

अव्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरने द्वितीय मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तो नवा विंबल्डॉन ठरला. चार सेट्सपर्यंत रंगलेल्या किताबी लढतीत सिनरने अल्काराजवर 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशा फरकाने मात करत फ्रेंच ओपनमधील पराभवाची परतफेड केली.

सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये अल्काराजने आक्रमक खेळ करत 6-4 असा विजय मिळवला आणि सुरुवातीला आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर सिनरने कमालीचा खेळ करत उर्वरित तीनही सेट्समध्ये अल्काराजला एकदाही आपली सर्व्हिस ब्रेक करू दिली नाही.