
नागपुरातील एक महिला पाकिस्तानी पुजाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. सुनीता जांगडे (43) असे या महिलेचे नाव असून ती लडाखमध्ये तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेली होती, परंतु मुलाला हॉटेलमध्ये सोडून ती बेपत्ता झाली. त्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली, मात्र पाकिस्तानी रेंजर्सनी तिला सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. सध्या सुनीताची कसून चौकशी सुरू आहे. 14 मे रोजी कारगीलच्या हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा ओलांडून सुनीता पाकिस्तानात गेली होती. येथून ती गिलगीट बाल्टिस्तानमध्ये पोहोचली. ंहोती.