
शिवसेसेनेच्या वतीने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. पोलीस दलातील महिलांचा यावेळी शाल व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या उपशाखाप्रमुख व भारतीय कामगार सेना कार्यकर्त्या अर्चना बच्छाव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना शाखाप्रमुख दीपक सनस आणि स्वाती तावडे यांच्या सहकार्याने अर्चना खळदकर, अनिता चोरघे, साबळे, तसेच जगताप, गालफाडे, दुडे, अहिरे यांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना विभाग क्रमांक 4 च्या संघटक अनिता बागवे यांच्यासह पुष्पा पेपरिया, सुरेखा कांबळे, जयश्री जनस्कर, सीमा पाटील, ललिता सरोदे आदी उपस्थित होते.





























































