>>प्रसाद नायगावकर
उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात पावसाचा लंपडाव सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये महागांव शहरातील वीजपूरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शहरातील महिलांनी एकत्र येत महावितरण कार्यालयावर ठिय्या मोर्चा काढला.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये महवितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरू आहे. दररोज वीजपुरवठा खंडती केला जात आहे. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच लहाणांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे वैतागले आहेत. घरात पिण्यासाठी पाणी नाही, ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. शेतकऱ्यांना सुद्धा याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महवितरणसमोर संतप्त महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलन स्थळी उपस्थित महिलांनी यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. वारंवार खंडीत होत असलेल्या विद्युत पूरवठ्याला कंटाळून अखेर आम्ही हा निर्णय घेतला. नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. असा निर्धार महिलांनी केला होता. महिलांचा रुद्रावतार पाहून महवितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे त्यांना नमते घ्यावे लागले आणि तात्पुरता विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात आला. महवितरण कंपनीचा असाच बेताल कारभार सुरू राहिता तर नागिरकांचा मोठा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
महवितरण कर्मचाऱ्यांची झोप उडवणारे हे ठिय्या जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात सांगिता डहाळे, संगीता पवार, मंजुशा नरवाडे, ललीता आरके, श्रद्धा मस्के, तामीनी पवार, अनिता आढाव, ज्योती फुलगोवीरवार, अनिता मोहिते, पुजा हरबडे, प्रियंका काळसरे, अबेली अन्नमवार, चैताली भोयर, प्रजंना ठाकरे, रंजना जगताप, सुनीता राऊत, मनिषा कल्याणकर, सुबद्रा भरखाडे, अर्चना भरखाडे, वंदना राठोड, सुरेखा दमकोंडावार, वनमाला केदार, प्रतिभा पाईकराव, जेके जोशी, दिपाली चव्हाण, लक्ष्मी गंगावणे सह आदी महिलांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.