डॉक्टर अत्याचार, हत्येच्या निषेधार्थ देशभर काम बंद

कोलकाता येथील एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या झाल्यानंतर डॉक्टरांमध्ये प्रक्षोभ उसळला आहे. आज देशभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णोपचार आणि तातडीच्या नसलेल्या शल्यक्रीया आदी सेवा ठप्प झाल्या होत्या.

तातडीच्या सेवा वगळता सर्व रुग्णसेवा बंद राहातील, असे या बंदचे आवाहन करणाऱ्या फेडरेशन ऑफ डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी सात दिवसांच्या आत तपास पूर्ण न केल्यास प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. येथील आर जी कार रुग्णालयातील या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीच्या मागणीसाठी ज्युनियर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.