जगातली सगळ्यात मोठी नदी का आटतेय? धक्कादायक कारण आले समोर

जगातली सर्वात मोठी नदी समजली जाणारी अ‍ॅमेझॉन नदी आटत चालली आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 121 वर्षात पडलेला हा सर्वात मोठा दुष्काळ असून यामुळे पाण्याचे तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. या नदीचे तापमान सामान्य मनुष्याच्या शरीराच्या तापमानापेक्षा दोन अंशांनी वाढले आहे. त्यामुळे या नदीतले लाखो जीवजंतू मरण पावले असून त्यात 150 डॉल्फिन माशांचाही समावेश आहे. पण ही नदी का सुकत चाललीये? हा दुष्काळ का पडतोय?

काय आहे कारण?
2007 साली IPCC च्या अहवालात म्हटलं होतं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे अल नीनो सारखी परिस्थिती सातत्याने निर्माण होईल. निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय. यासाठी जगातला प्रत्येक देश आणि प्रत्येक व्यक्ती कारणीभूत आहे.

अटलांटिक डिपोलमुळे अ‍ॅमेझॉन नदीत दुष्काळ पडला आहे. अटलांटिक डिपोलमुळे उष्णकटिबंधीय अटलांटिक महासागराच्या उत्तर भागात पाणी गरम होतं. तर दुसरीकडे अटलांटिकच्या दक्षिण भागात पाणी थंड असतं. त्यामुळे अटलांटिक डिपोल ही अवस्था निर्माण होते आणि अ‍ॅमेझॉन नदीत दुष्काळ पडतो. अशी अवस्था 2005 आणि 2010 मध्ये निर्माण झाली होती.

41 वर्षांपूर्वी 2 लाख लोकांचा मृत्यू

1982 आणि 1997 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशांत महासागराच्या पूर्व भागात अल निनो वादळ धडकलं होतं आणि बराच वेळ त्याचा प्रभाव राहिला होता.अल नीनोमुळे अ‍ॅमेझॉनच्या उत्तर भागात दुष्काळ पडतो. व्हेनझुएलासोबत ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या रोराईमा प्रांत हा जंगल्यातल्या आगीमुळे ओळखला जातो. 1982 साली अ‍ॅमेझॉन जंगलातली अनेक झाडं नष्ट झाली होती. तसेच इथिओपिया आणि आफ्रिकन देशात दुष्काळ पडून दोन लाखहून अधिक लोकांचा मृत्यू झाल होता.