WPL 2026 – मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का! दुखापतीमुळे महत्त्वाची खेळाडू स्पर्धेतून बाहेर, रिप्लेसमेंट पाहून तुम्हीही अवाक व्हाल

WPL 2026 मध्ये मुंबई इंडिनन्सची कामगिरी काहीशी निराशाजनक राहिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. मात्र, दोनच सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असून प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी संघाला दमदार पुनरागमन करावं लागणार आहे. अशातच मुंबईची विस्फोटक फलंदाज गुणालन कमलिनी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्याजागी 22 वर्षीय नवख्या खेळाडूची संघात वर्णी लागली आहे.

धावपटू नाही, आता क्रिकेटपटू? उसेन बोल्टचे पहिले प्रेम पुन्हा उफाळले; लॉस एंजिल्स ऑलिम्पिकसाठी क्रिकेटची हाक 

RCB ने प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. उर्वरित दोन जागांसाठी तीन संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स आणि युपी या तिन्ही संघांचे सध्या समान गुण असून स्ट्राईक रेटच्या जोरावर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्पर्धेतलं वातावरण सध्या गरमागरम आहे. अशातच मुंबईची यष्टीरक्षक फलंदाज कमलिनी स्पर्धेतून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, तिच्या जागी 22 वर्षीय फिरकीपटून वैष्णवी शर्माची रिप्लेसमेंटम्हणून संघात निवड करण्यात आली आहे. यष्टीरक्षक फलंदाजाच्या बदल्यात फिरकीपटूला संघात घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वैष्णवी शर्मा 2025 च्या टी20 वर्ल्ड कप विजेत्या हिंदुस्थानी संघाचा ती भाग होती. WPL ऑक्शनमध्ये तिला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. मात्र, आता मुंबईने तिला 30 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.