>>जे. के. पवार
वाढतं वजन हा आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. ती नुसती समस्या नाही, तर भविष्यातील अनेक आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींचं ते मूळ आहे. कोणत्याही प्रश्नांवर उपाय वा उत्तरं मिळवायची असतील तर आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे डोळसपणे पाहावं लागतं. काही चुका असल्यास त्या सुधारून आदर्श जीवनशैली ठरवावी लागते. प्रस्तुत पुस्तकात वजन कमी करण्यासाठी काही मूलभूत नियमांसह संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, झोप आणि मनातल्या भावनांचा निचरा करण्यासाठी काही उपाय यावर अत्यंत सोप्या भाषेत यथासांग माहिती दिली आहे. जीवन एकदाच मिळतं, म्हणून चांगलं जगा हे सत्य आपण जाणून घ्यायला आणि स्वीकारायलाही हवं. निरोगी जीवन जगण्यासाठी आणि आरोग्याच्या मार्गावर चालण्यासाठी ते आवश्यक आहे. वजन कमी करण्याची किंवा रोगांना प्रतिबंध करण्याची ‘जीवनशैली’ हीच जादूची गोळी आहे. या पुस्तकात जीवनशैलीतील सर्वात चांगले असे 62 बदल कसे करायचे? हे सांगितलं आहे. आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक ‘का?’ ‘कशामुळे?’ चं समाधानकारक उत्तर इथे देण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा प्रस्तुत पुस्तक संग्रही ठेवा, आचरणात आणा आणि जीवनशैलीत बदल घडवून आयुष्य किती सुदंर आहे याचा प्रत्यय घ्या, एवढंच सांगणं. शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात, नाही का?
द मॅजिक वेट – लॉस पिल
n लेखक ः ल्यूक कुटिन्हो, अनुष्का शेट्टी
n अनुवाद ः डॉ. अरुण मांडे
n प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
n पृष्ठसंख्या ः 208 n किंमत ः 250/- रुपये