गणेशोत्सवानिमित्त यामाहाच्या दुचाकींसाठी विशेष सवलत योजना

सणासुदीच्या दिवसांत (Ganeshotsav) अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बड्या कंपन्या विशेष सवलती घेऊन येतात. यामाहा (Yamaha)  कंपनीने त्यांच्या दुचाकीसाठी (Offer on two wheeler) एक सवलत जाहीर केली आहे. कर्जावर दुचाकी घेणाऱ्यांसाठी ही सवलत असणार आहे.

या सवलतीअंतर्गत ग्राहक 7999 रुपये देऊन बाईक आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. दुचाकीसाठीचा कर्जाचा दर हा 7.99 टक्के इतका ठेवण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकाला 3 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत ही सवलत लागू असणार आहे.

या दुचाकींसाठी मिळणार सवलत

  • वायझेडएफ-आर15 व्‍ही4 (155 सीसी),
  • वायझेडएफ-आर155 व्‍ही3 (155 सीसी),
  • एमटी-15 व्‍ही2 (155 सीसी),
  • एफझेडएस-फाय व्‍हर्जन 4.0 (149 सीसी),
  • एफझेडएस-फाय व्‍हर्जन 3.0 (149 सीसी),
  • एफझेड-फाय व्‍हर्जन 3.0 (149 सीसी),
  • एफझेड-एक्‍स (149 सीसी) आणि
  • ऐरॉक्‍स 155 (155 सीसी),
  • फॅसिनो 125 फाय हायब्रिड (125 सीसी),
  • रे झेडआर 125 फाय हायब्रिड (125 सीसी),
  • रे झेडआर स्ट्रीट रॅली 125 फाय हायब्रिड (125 सीसी)