
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे जनतेशी नाळ जोडलेले नेते होते. हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले. त्यांनी राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचे माध्यम बनवले. बाळासाहेबांचे संपूर्ण आयुष्य साहस, स्पष्टता आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे प्रतीक होते,’ अशा शब्दांत आदित्यनाथ यांनी आदरांजली वाहिली.





























































