असं झालं तर…जीमेलचा पासवर्ड विसरलात..

तुम्ही तुमचा जीमेल पासवर्ड विसरला असाल तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या  गोष्टी करून  तुम्ही जीमेल अकाउंटमध्ये काही मिनिटांत पुन्हा प्रवेश करू शकता.

सर्व प्रथम आपल्या ब्राउझरमध्ये जीमेल अकाऊंट रिकवरी पेज उघडा. तिथे  तुमचा जीमेल अॅड्रेस टाकावा लागेल आणि ‘नेक्स्ट’ बटणावर क्लिक करा.

जीमेल प्रथम तुम्हाला तुमचा पूर्वीचा पासवर्ड विचारेल. जुना पासवर्ड आठवत नसेल, तर ‘ट्राय अनदर वे’ हा पर्याय निवडा.

जीमेल तुमच्या खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवेल. तो ओटीपी एंटर करा आणि ‘नेक्स्ट’ बटण दाबा.

तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर जीमेल   तुमच्या बॅकअप ईमेलवर पडताळणी लिंक पाठवू शकते. काही प्रकरणांमध्ये, सुरक्षा प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय मिळतो.