लव्ह जिहादच्या नावाखाली तरुणाला बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला लव्ह जिहादच्या नावाखाली बेदम मारहाण केली. हा तरुण एका मुलीसोबत रस्त्याच्या कडेला उभा होता. तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारले, नंतर त्याच्याकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा वदवून घेतल्या. तरुणाने जय श्रीराम म्हटल्यावरही त्याला शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि चपलांनी मारले. ऋषभ ठाकूरने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आणि रात्री उशिरा ऋषभ ठाकूरला अटक केली.