
अंकली रेल्वे पुलावर रेल्वेतून थेट कृष्णा नदीपात्रात उडी घेऊन तरुणाने आपले जीवन संपवले. सदरची घटना दुपारी घडली. नदीत पाणी कमी असल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हात आणि पाय तुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, तरुणाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
आत्महत्या केलेला तरुण जोधपूर ते कोल्हापूर या एक्स्प्रेस रेल्वेमधून सांगली ते कोल्हापूर असा प्रवास करत होता. मिरज जंक्शन सोडून रेल्वे अंकली येथील कृष्णा नदी पुलावर आली असता, तरुणाने रेल्वेतून नदीत उडी घेतली. कृष्णेच्या पात्रात पाणी कमी असल्याने त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचे हात आणि पाय मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाने उडी मारल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.




























































