गोव्याहून मालवणीत शस्त्र घेऊन आलेल्या तरुणाला अटक

गोव्याहून मालवणी येथे देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या आरीफ शहा या तरुणाला मालवणी पोलिसांनी रंगेहात पकडले. मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे व त्यांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना म. वा. देसाई मैदानाजवळील फुटपाथवर एक तरुण पाठीमागच्या बाजूला पिस्तूल खोचून फिरत असल्याची माहिती त्यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार हिंडे व पथकाने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन आरीफला ताब्यात घेतले.