मोबाईलवर पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तो आपलाच व्हिडीओ काढतोय असा गैरसमज करून घेत त्या रागात 5 जणांनी एकाचा पाठलाग करत सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून निघृण खून केल्याची घटना एमआयडीसी जवळ असलेल्या सह्याद्री चौकात घडली आहे. स्टीफन अविनाश मिरपगार (वय 33, रा. आंधळे-चौरे चौक, नवनागापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत मृताची पत्नी काजल स्टीफन मिरपगार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती स्टिफन हे सोमवारी ( (दि.4) मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास सह्याद्री चौक येथील पान टपरी जवळ मोबाईलवर फिर्यादी सोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होते. त्यावेळी तेथे आरोपी संग्राम सोन्याबापू कदम (वय 19, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर), किरण ता बाळासाहेब गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनी शिंगणापूर, ता. नेवासा) यांच्यासह 2 अल्पवयीन मुले असे 5 जण तेथे आले. त्यावेळी स्टिफन हा त्यांचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढत असल्याचा गैरसमज करून घेत त्यांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. थांब तुला आता दाखवतोच असे म्हणत व्यास काही वेळात ते 5 जण मारायला लागले असता तो जीव वाचविण्याच्या दृष्टीने पळू लागला. या 5 जणांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावं डोक्यात सिमेंटचे ब्लॉक फेकून मारने. त्यामुळे स्टीफन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला व काही वेळातच तो मृत झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
त्यानंतर मृत स्टिफन याची पत्नी काजल हिने सोमवारी (दि.10) रात्री एम आयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी 5 जणांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम 302, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर यातील आरोपी संग्राम सोन्याबापू कदम (वय 19, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) यास व 2 अल्पवयीन आरोपी अशा तिघांना पोलिसांनी रात्री 10 वाजता अटक केली आहे. तर किरण बाळासाहेव गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनी शिंगणापूर, ता. नेवासा) हे दोघे फरार आहेत, पुढील तपास स.पो. नि. माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद परदेशी है करत आहेत.
अगोदर वाटला ‘अपघात’
तपासातून समोर आला ‘घातपात’ मयत स्टेिफन याचा मृतदेह जूनला पहाट सह्याद्री चौकात नगर मनमाड महामार्गालगत आढळून आला होता, डोक्याला भार असल्याने प्रारंभी ती अपघात पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोद केली असावा असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे होती. मात्र तेथे कुठल्याही वाहनाची धड़क बसल्याचे तसेच त्याच्या जवळही वाहन नसल्याचे निदर्शनास आल्यावर स.पो.नि. माणिक चौधरी आणि पथकाने कुतुहलापोटी बारकाईने तपास सुरु केला