
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात योगेश वर्मा (38) नावाची व्यक्ती नाल्यात पडल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलामार्फत शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले होते. आज बुधवारी दुपारी वर्मा यांचा मृतदेह सापडला. एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह शोधून काढून पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. कांदिवली येथे 22 वर्षीय मुलगा तलावात पडला. सोनू विश्वकर्मा असे मुलाचे नाव आहे. चारकोप गाव येथील दिंगेश्वर तलावात सोनू बुडाल्याचे समजताच अग्निशमन दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.


























































