अवैध खाण काम प्रकरणी वायएसआरसीपीचे नेते गोवर्धन रेड्डी यांना अटक

अवैध खाण काम प्रकरणात आंध्र प्रदेश पोलिसांनी माजी मंत्री तथा वायएसआर काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) वरिष्ठ नेते काकाणी गोवर्धन रेड्डी यांना अटक केली. केरळमधील बेकायदेशीर क्वार्ट्ज खाण काम प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रेड्डी यांना आंध्र प्रदेश पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा केरळमधून ताब्यात घेतले. वेंकटगिरी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बेकायदेशीर खाण काम, स्पह्टकांचा अनधिकृतपणे अमाप वापर आणि आदिवासींना शिवीगाळ केल्या प्रकरणी रेड्डी यांना अटक करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बेकायदेशीरपणे स्पह्टके वापरणाऱ्या रेड्डी यांना स्थानिक आदिवासींनी विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.