मायझवाने चाहत्यांमध्ये वाटले 90 लाख डॉलर्स, कारण वाचाल तर हैराण व्हाल

1579

युसाकू मायझवा हे नाव जपानमधील फॅशन जगतातील मोठं नाव आहे. त्यांना अचानक एक सणकी आली आणि त्याने ट्विटरवरील त्याच्या पाठीराख्यांना ( Followers ) 90 लाख डॉलर्स देण्याचं ठरवलं. आपला हा एक सामाजिक प्रयोग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे पैसे मिळाल्याने पाठीराखे आनंदी होतात का हे आपल्याला पाहायचे असल्याचे मायझवा यांनी सांगितले.

मायझवा यांनी 1000 पाठीराख्यांना प्रत्येकी दहा लाख येन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. दहा लाख येन म्हणजे 9 हजार डॉलर्स इतकी रक्कम होते. 1 जानेवारी रोजी मायझवाचे ट्विट ज्या लोकांनी रिट्विट केले होते. त्यातील पाठीराखे निवडले जाणार आहेत. या पाठिराख्यांना जे पैसे मिळतील त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय फरक पडतो हे नियमितपणे तपासले जाणार आहे. हा एक अत्यंत महत्वाचा सामाजिक प्रयोग असून यामध्ये संख्यातज्ज्ञांनी आणि अर्थकारण्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मायझवा याने केले आहे. मायझवा हा इलॉन मस्कच्या स्पेस-एक्स कार्यक्रमाद्वारे चंद्रावर जाणारा पहिला प्रवासी असणार आहे. कला आणि महागड्या गाड्यांचा शौकीन असलेला मायझवा हा त्याच्या वारेमाप खर्चासाठीही प्रसिद्ध आहे. मायझवा हा त्याच्या पैशांशिवाय जग कसे असेल याबाबतच्या भाकितांसाठीही प्रसिद्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या