
जगविख्यात तबला वादक झाकिर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. ते फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होते, जाणून घेऊया याविषयी.
झाकिर हुसेन यांच्या कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन यांच्या फुफ्फुसामध्ये फायब्रोसिस होते. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती आणि ते फार अशक्त झाले होते. त्यांच्या आजारपणाचे मुख्य कारण त्यांचा अनियंत्रित रक्तदाब होता. त्यांचा बीपी सतत वाढत कमी होत होता. फायब्रोसिस अनेक कारणांमुळे होतो. फुफ्फुसातील फायब्रोसिस असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो.