झोमॅटोची 15 मिनिटांतील डिलिव्हरी सेवा बंद

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने (इटरनल) त्यांची 15 मिनिटांची जलद डिलिव्हरी सेवा बंद केली आहे. झोमॅटोने ही सेवा चार महिन्यांपूर्वी सुरू केली होती. देशातील बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, मुंबईसारख्या महानगरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. 2022 मध्ये, झोमॅटो इन्स्टंट नावाची दहा मिनिटांची डिलिव्हरी सेवादेखील बंद करण्यात आली होती. झोमॅटोने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 59 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तथापि, वार्षिक आधारावर त्यात 57 टक्के घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये पडझड सुरू आहे.