मोदी इंग्रजीत एक वाक्यसुद्धा धड बोलू शकत नाहीत, ममता बॅनर्जींचा हल्ला

249

सामना ऑनलाईन । कोलकाता

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भरमसाट भाषणे देतात, पण ते इंग्लिशमध्ये एक वाक्यसुद्धा बोलू शकत नाहीत, म्हणून इंग्लिशमध्ये बोलताना त्यांना टेलिप्रॉम्पटरकडे बघावे लागते, हे अख्ख्या मीडियाला ठाऊक आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर आज चढवला.

मोदी टेलिप्रॉम्पटरच्या स्क्रीनकडे पाहतात. त्यांना इंग्लिशमध्ये जे काही सांगायचे आहे ती वाक्ये वाचतात, पण आपण अस्खलित इंग्लिश बोलू शकतो, अशा आविर्भावात भाषण करतात, असे सांगून ममता म्हणाल्या की, आम्हाला त्यांच्यासारखे काही करावे लागत नाही.

‘आयुष्मान भारत’ या आरोग्य योजनेतून आपले राज्य बाहेर पडत आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. मोठमोठे कामगिरीचे दावे करायचे आणि श्रेय खेचायचे असा सरकारचा खाक्या आहे. पंतप्रधान हे कोणत्याही योजनेचे श्रेय घेण्यासाठी आपली ‘छबी’ असलेली पत्रे घराघरात पाठवत आहेत. मग कुठल्याही योजनेची सारी जबाबदारी केंद्र सरकारनेच शिरावर घ्यावी. त्यात आम्ही 40टक्के वाटा द्यायचा कशासाठी, असा सवालही ममतांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या