संस्थापक संपादक : बाळ ठाकरे | संपादक : उध्दव ठाकरे | कार्यकारी संपादक : संजय राऊत

आज दिवसभरातील ४ टॉप स्टोरीज

सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाडीवर कारवाई
सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाडीवर कारवाई
सोलापूर - सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात फॅन्सी नंबरप्लेट असलेली कार वापरल्याचे उघड झाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याची गंभीर दखल घेऊन या कारवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सोलापूर वाहतूक विभागाने नोटीस बजावून ती नंबरप्लेट जप्त केली. ....
हिंदुस्थान सहिष्णू; मी इथेच राहणार
हिंदुस्थान सहिष्णू; मी इथेच राहणार
नवी दिल्ली : अभिनेता आमीर खान, निर्माता करण जौहर यांनी असहिष्णूतेवरून वक्तव्य करीत हिंदुस्थानात राहायचे की नाही यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असतानाच अभिनेत्री कतरिना कैफने मात्र हिंदुस्थान हा सहिष्णू देश असून मी आयुष्यभर इथेच राहीन, अशी भावना व्यक्त केली आहे. ....
डेव्हिड हेडलीचा आजचा जबाब बरेच पुरावे देणार
डेव्हिड हेडलीचा आजचा जबाब बरेच पुरावे देणार
नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यावेळी अजमल कसाबच्या दहशतवादी टोळीने ओबेरॉय आणि ताज या पंचतारांकित हॉटेलांसहित नरीमन हाऊस, कॅफे लिओपोल्ड, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कामा अ‍ॅण्ड आल्बलेस हॉस्पिटल या ठिकाणांवर हल्ले चढवले होते. ....
हिंदुस्थानच्या सागरी सुरक्षेला दहशतवादाचा धोका
हिंदुस्थानच्या सागरी सुरक्षेला दहशतवादाचा धोका
विशाखापट्टणम, दि. ७ (वृत्तसंस्था) - मुंबईवर २६/११चा हल्ला पाकिस्तानमार्फत झाला याचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सागरी सुरक्षेला समुद्रमार्गे होणार्‍या दहशतवादी कारवाया आणि चाचेगिरीच्या आव्हानांचा मोठा धोका आहे, असा इशारा त्यांनी येथे बोलताना दिला. ....

आणखी बातमी »

मुंबई

चौफेर अभ्यास हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यातील विषयांचा चौफेर अभ्यास करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले.

पुणे

परिवहनमंत्र्यांचा पुणेकरांना दिलासा
पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - शहरात हेल्मेट वापरताना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी आणि कायद्यातील तरतुदीसंबंधी विधी व न्याय विभागाशी चर्चा करण्याचे आश्‍वासन देत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुणेकरांना दिलासा दिला.

पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात शिवसेनेच्या ६९ हुतात्म्यांना अभिवादन
कोल्हापूर, दि. ८ (प्रतिनिधी) - बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करू. हुतात्मा झालेल्या ६९ शिवसैनिकांचेही बलिदान सार्थ करू, अशी शपथ मराठी भाषक सीमाभागात घेण्यात आली.

संभाजीनगर

महाराष्ट्र दिनापूर्वी आयुक्तालयाचे विभाजन!
संभाजीनगर, दि. ८ (प्रतिनिधी)- संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभाजनाचा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन महाराष्ट्र दिनापूर्वी घेण्याचा विचार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

चौफेर अभ्यास हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यातील विषयांचा चौफेर अभ्यास करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा इतिहास पुन्हा उजळणार

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा इतिहास पुन्हा उजळणार

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) — बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीकरिता १९६९ मध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनात ६९ आंदोलकांनी प्राणाची आहुती दिली.

हरयाणाच्या कुख्यात गुंडाचा मुंबईत एन्काऊंटर

हरयाणाच्या कुख्यात गुंडाचा मुंबईत एन्काऊंटर

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - अंधेरीच्या एअरपोर्ट मेट्रो या हॉटेलमध्ये आज गुरगाव पोलीस आणि हरयाणाच्या नामचीन गुंडामध्ये जबरदस्त चकमक उडाली. संदीप गडोली (४०) असे त्या गुंडाचे नाव असून हरयाणात त्याच्यावर हत्या, अपहरण, रॉबरी यासारखे ३४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भ्रष्ट अधिकार्‍यांना विजय कांबळे व दत्ता पडसलगीकरांचा दणका

भ्रष्ट अधिकार्‍यांना विजय कांबळे व दत्ता पडसलगीकरांचा दणका

मुंबई, दि. ७ (विशेष प्रतिनिधी) - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक विजय कांबळे यांनी भ्रष्ट शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध तीव्र मोहीम उभारली असतानाच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा इशारा पोलीस अधिकार्‍यांच्या पहिल्याच बैठकीत दिला आहे.

परिवहनमंत्र्यांचा पुणेकरांना दिलासा

परिवहनमंत्र्यांचा पुणेकरांना दिलासा

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - शहरात हेल्मेट वापरताना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी आणि कायद्यातील तरतुदीसंबंधी विधी व न्याय विभागाशी चर्चा करण्याचे आश्‍वासन देत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुणेकरांना दिलासा दिला.

हेल्मेट कारवाईबाबत पोलिसांनी माझ्याशी चर्चा केली नाही

हेल्मेट कारवाईबाबत पोलिसांनी माझ्याशी चर्चा केली नाही

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - शहरात हेल्मेटसक्ती आणि दंडवसुली करण्यासंदर्भात पोलिसांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पालकमंत्री या नात्याने माझ्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, असा निशाणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर साधला.

प्रियकराच्या मदतीने आईकडूनच मुलाचा खून

प्रियकराच्या मदतीने आईकडूनच मुलाचा खून

हडपसर, दि. ७ (सा. वा.) - जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केला आणि मृतदेह पुरून टाकला. त्यांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्यात पावणेसहा कोटी साखरपोत्यांचे उत्पादन

राज्यात पावणेसहा कोटी साखरपोत्यांचे उत्पादन

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता मावळतीकडे सरकला आहे. २२ कारखान्यांचा पट्टा पडून हंगाम बंद झाला. पाच कोटी ७० लाख साखरपोत्यांचे उत्पादन चालू हंगामात झाले असून, राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे.

पाकिस्तान सरकारनेच घडवला मुंबईवर हल्ला

पाकिस्तान सरकारनेच घडवला मुंबईवर हल्ला

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या कटांची आखणी करून ते तडीस नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली यानेच आता पाकिस्तानचा ‘दहशतवादी’ चेहरा जगासमोर आणला आहे. ‘लश्कर-ए-तोयबा’ने २००८ सालात मुंबईवर केलेल्या ‘२६/११’च्या हल्ल्याला पाकिस्तान सरकारने सर्वतोपरी पाठबळ दिले होते असा जबाब त्याने आज ‘एनआयए’च्या चौकशीत दिला.

हेल्मेट वापरावेच लागेल

हेल्मेट वापरावेच लागेल

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारचा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यामुळेच राज्यात सर्वत्र हेल्मेट वापराबाबतचे नियम लागू करण्यात आले आहेत. हा कायदा बदलण्याचा अधिकार राज्याला नाही त्यामुळे हेल्मेट वापरावेच लागेल असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

बंद दाराची लोकल अखेर यार्डात

बंद दाराची लोकल अखेर यार्डात

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - रोज घडणारे अपघात, गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे प्रवाशांचे मृत्यू आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे पडणारे फटकारे यामुळे रेल्वे खात्याने बंद दाराच्या लोकल सुरू करण्याचा प्रयत्न केला खरा, पण हे तंत्रज्ञान देणार्‍या कंपन्यांनीच या योजनेतून हात काढून घेतले आहेत.

सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाडीवर कारवाई

सहकारमंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाडीवर कारवाई

सोलापूर - सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात फॅन्सी नंबरप्लेट असलेली कार वापरल्याचे उघड झाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याची गंभीर दखल घेऊन या कारवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सोलापूर वाहतूक विभागाने नोटीस बजावून ती नंबरप्लेट जप्त केली.

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

जीवनगाणे : कसे प्यावे... त्यांचे सूर

सोशल मीडियामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. एका अर्थानं त्यामुळे विचारांचं एक लोकशाहीकरण झालं. रूढ माध्यमांची मक्तेदारी संपली आणि प्रत्येकाला आपापलं म्हणणं जगापुढे मांडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. पण यामुळे साहित्यचोरीही वाढली. इतरांच्या फेसबुकच्या पोस्ट, विनोद, कविता आपलंच साहित्य म्हणून लोक खपवू लागले.

खास बात : अंगठी रे...

खास बात : अंगठी रे...

स्टाईल सिम्बॉल झालेल्या टॅटूच्या प्रेमात लव्हबर्ड्स पडले असून एकमेकांची केवळ नावंच नव्हे तर कुठे भेटलो किंवा पहिल्या डेटच्या आठवणीची निशाणी कोरण्याची फॅशन सध्या बहरात आली आहे. अनामिकेत अंगठी घातली की वाञनिश्‍चय झाला असं समजायचा काळ गेला. आता टॅटूची अंगठी हा प्रेमातला नवा बदल आहे.

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

हौशीने शिकणार त्याला आयआयटी शिकवणार

‘रट्टा मत मार... काबील बन, कामियाबी तो झक मार के पिछे आएगी...’ सिनेमातला डायलॉग तिथंच संपतो अन् तरुणाईचं रुटीन पुन्हा तसंच धावायला लागतं... तीच शाळा, तेच कॉलेज, तीच परीक्षा आणि तीच रट्टा मारण्याची स्टाईल... हे कुठेतरी बदलायला हवं... आयआयटीचे ‘काबील बन’ हे तत्त्व तरुणाईत रुजायला हवे. त्यासाठीच आयआयटीने ‘मुक्स’ कल्पनेला जन्म दिलाय... आयआयटीची कल्पना आहे... ती तेवढीच भन्नाट असणार!

अँकर : वाह पंडितजी

अँकर : वाह पंडितजी

हार्मोनियमच्या पट्ट्यावरून ज्यांची बोटे वयाच्या ८१व्या वर्षी आजही तरुणाईला लाजवतील अशा सफाईने फिरतात. संगीत हेच जीवन... त्याचीच उधळण करत तरुणाईच्या मनामनात संगीत रुजवणार्‍या पंडित तुळशीदास बोरकर यांना ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर त्यांच्या संगीतसुरांनी भारलेल्या गझलकाराने व्यक्त केलेली कृतज्ञता... वाह... पंडितजी वाह...!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

रोखठोक : टिळक, आगरकर आणि खडसे!

टिळक-आगरकरांची पत्रकारिता इतिहासजमा झाली, पण त्याच महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांच्या रूपाने पत्रकारितेची नवी परंपरा उदयास आली. पाकिटे दिल्याशिवाय बातम्या छापल्या जात नाहीत, असे खडसे म्हणतात. त्यांचा कोणी साधा निषेध केला नाही. कारण खडसे खरेच बोलत आहेत.

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

लक्षवेधी : भरती-ओहोटीतला थरार

मुरुड - जंजिरा येथील समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या पुण्यातल्या आबेदा इनामदार महाविद्यालयाचे १४ विद्यार्थी बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आणि पुन्हा एकदा समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षितता, स्वत: घेण्याची खबरदारी याकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष यावर चर्चा सुरू झाली.

जातपंचायतीचा अमानुष विळखा

जातपंचायतीचा अमानुष विळखा

महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत जातपंचायतींबाबत सक्षम कायदा होणे गरजेचे आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल ठरेल. या कायद्याअभावी आज लाखो जीव अमानुष शिक्षेला, बहिष्काराला बळी पडत आहेत.

टिवल्या बावल्या : ओळख

टिवल्या बावल्या : ओळख

माझे ज्येष्ठ स्नेही व ‘साहित्यिक फिरक्या’ कार्यक्रमातील मान्यवर सहकारी (कै.) वि. आ. बुवा म्हणायचे, ‘समारंभात प्रमुख पाहुण्याची ओळख करून देणारा सोडून बाकी सगळे त्याला चांगला ओळखत असतात.’ अगदी खरं आहे.

‘नंबर वन’च्या सिंहासनाची लढाई

पुणे, दि. ८ (क्री. प्र.) - गहुंजेतील एमसीए स्टेडियमवरील लढतीने हिंदुस्थान-श्रीलंका टी-२० क्रिकेट मालिकेस उद्या, ९ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. या मालिकेकडे टी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून बघितले जात असले तरी महेंद्रसिंग धोनीच्या हिंदुस्थानला ‘नंबर वन’चे सिंहासन राखण्यासाठी ही मालिका जिंकावीच लागणार आहे.

बलाढ्य हिंदुस्थानपुढे श्रीलंकेचे आव्हान

मिरपूर, दि. ८ (वृत्तसंस्था) - फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपली दबंगगिरी कायम ठेवणार्‍या आणि स्पर्धेत बाद फेरीपर्यंत पराभवाचे तोंड न पाहणार्‍या हिंदुस्थानचा १९ वर्षार्ंखालील युवा क्रिकेट संघ उद्या मंगळवारी युवा विश्‍वचषक उपांत्य लढतीत दुसरा आशियाई दिग्गज संघ श्रीलंकेशी झुंजणार आहे.

तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक

गुवाहाटी/शिलाँग, दि. ८ (वृत्तसंस्था) - यजमान हिंदुस्थानी खेळाडूंनी १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट सोमवारीही सुरूच ठेवली. तिरंदाजीमध्ये तर हिंदुस्थानी खेळाडूंनी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साजरी करून आजचा दिवस गाजवला.

पाटणा पायरेट्स, बेंगाल वॉरियर्स यांच्यात काँटे की टक्कर

कोलकाता, दि. ८ (वृत्तसंस्था) - स्टार स्पोर्टस् प्रो कबड्डी स्पर्धेच्या तिसर्‍या हंगामात सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक करणारे पाटणा पायरेट्स, बेंगाल वॉरियर्स मंगळवारी आमनेसामने येत आहेत.

पिंपरी-चिंचवडवर सीसीटीव्हीची ‘नजर’

पिंपरी-चिंचवडवर सीसीटीव्हीची ‘नजर’

पिंपरी, दि. ७ : पिंपरी-चिंचवड शहर आता संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीखाली येणार आहे. महापालिकेने सहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय यापूर्वी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा ऑप्टिक फायबरद्वारे जोडण्यात येणार आहे.

आता एका क्लिकवर उपलब्ध होणार पुजारी, पंडितजी

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा, लग्न, वास्तुशांती आहे; पण त्यासाठी पंडीतजी, पुजारी मिळत नाही. काळजी नको, कारण आजच्या इंटरनेटच्या जमान्यात केवळ एका क्लिकवर हे पुजारी, पंडितजी आपल्या शुभकार्याला उपलब्ध होणार आहेत.

दहा महिन्यांत आरटीओची ३३० कोटींची कमाई

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - वाहन खरेदीदारांची वाढती संख्या... मावळ, मुळशी, लोणावळा भागातील धनाढ्य... हौशा-गौशांकडून मिळणारा तुडुंब महसूल... यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या दहा महिन्यांत तीनशे तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करा - आढळराव-पाटील

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) - सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करा. सामान्यांसाठी संघर्ष करून कामे करून घेण्याची धमक फक्त शिवसेनेतच असल्याचे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले.