साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 एप्रिल ते शनिवार 20 एप्रिल 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – वर्चस्व वाढेल

मंगळ, गुरू लाभयोग, चंद्र, मंगळ युती. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून कोणताही निर्णय घ्या. मनातील सल व्यक्त करताना योग्य व्यक्ती निवडा. नोकरीत प्रभाव वाढेल. स्पर्धा करणारे वाढतील. धंद्यात उधारी नको. हिशोब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. तारतम्य ठेवा.

शुभ दिनांकः 14, 15

वृषभ – अहंकार नको

बुध, शुक्र युती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. नातलग, मित्र, सहकारी तुमच्या मदतीला येतील. अहंकार नको. संयम, नम्रता ठेवल्यास यश खेचून आणता येईल. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत वरिष्ठांना सहाय्य करावे लागेल. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थपणे निरीक्षण करा. घरातील सदस्यांची चिंता जाणवेल.

शुभ दिनांकः 14, 17

मिथुन – महत्त्वाची कामे करा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती, प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत मनाप्रमाणे बदल, बढती होईल. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. थकबाकी मिळवा. खरेदी-विक्रीत लाभ होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करा. श्रीरामनवमी नवी दिशा देणारी ठरेल.   पद, अधिकार मिळेल.

शुभ दिनांकः 17, 18

कर्क – कार्याला गती मिळेल

बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद, चिंता जाणवतील. प्रवासात घाई नको. बुधवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. नोकरीत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी लाभेल. धंद्यात नम्रता ठेवा. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात स्वतचे स्थान मजबूत करा. जनहिताच्या कार्यात यश मिळेल.

शुभ दिनांकः 17, 18

सिंह – प्रकृतीला जपा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. श्रीराम नवमीच्या दिवशी सावध रहा. वाद टाळा. वक्तव्य करताना काळजी घ्या. भावना अनावर होतील. प्रकृतीला जपा. नोकरीत कामाचा व्याप, स्पर्धा वाढेल. धंद्यात कर्जाचे ओझे नको. नवीन परिचय धोकादायक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. कठोर शब्द त्रासदायक ठरतील.

शुभ दिनांकः 14, 20

कन्या – रागावर नियंत्रण ठेवा

बुध, शुक्र युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. नातलग, मित्र यांच्यासोबत गैरसमज होतील. बुद्धिचातुर्य व मधुर बोलण्याने यश लाभेल. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात लाभ होईल. राग आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याशी तुलना करणारे वाढतील. घरात दगदग होईल.

शुभ दिनांकः 14, 17

तूळ – शब्द जपून वापरा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, मंगळ, गुरू लाभयोग. प्रत्येक दिवस उत्साहाचा, कठीण कामे करण्याचा आहे. नोकरीत वर्चस्व वाढेल. सहकारी स्पर्धा करतील. धंद्यात शब्द जपून वापरा. कोणताही निर्णय भावनेच्या दृष्टिकोनातून घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. पद, अधिकार मिळतील. जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील.

शुभ दिनांकः 14, 16

वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी राखा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. नम्रता, चातुर्य, गोड बोलणे यावर यश खेचावे लागेल. नविन परिचय होतील. आक्रमकता उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात वाढ, लाभ, वसुली होईल. नवा करार विचारपूर्वक कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तणाव, टीका, कुणालाही कमी लेखू नका.

शुभ दिनांकः 14, 16

धनू – व्यवहारात दक्ष रहा

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. काही व्यक्ती तुमचा गैरफायदा घेतात का, याकडे लक्ष ठेवा. पुढे उपयोग होईल. नोकरीत बदल, बढती शक्य होईल. धंद्यात, व्यवहारात दक्ष रहा. उधारी नको. नवीन परिचय तपासून मगच व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट कामे करून घ्या. प्रतिष्ठा, पद लाभेल.

शुभ दिनांकः 14, 15

मकर – निर्णयाची घाई नको

बुध, शुक्र युती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई नको. कला, साहित्यात प्रेरणादायक घटना घडतील. नावलौकिक लाभेल. दिग्गज परिचय होतील. नोकरीत तत्परता ठेवा. वरिष्ठांना विरोध करू नका. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक दिशा ठरवा. कौटुंबिक कामे होतील.

शुभ दिनांकः 16, 17

कुंभ – मानसन्मान लाभेल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध, शुक्र युती. भेटीत, चर्चेत यश मिळेल. नातलग, मित्र यांच्यासमवेत रहाल. तुमच्या क्षेत्रात प्रतिष्ठा, मानसन्मान लाभेल. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत कामाचा व्याप, प्रभाव राहील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल.

शुभ दिनांकः 14, 18

मीन – नवे परिचय होतील

बुध, शुक्र युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी तणाव, गैरसमज होतील. तुमच्या क्षेत्रात प्रगतीपथावर रहाल. कला, साहित्यात चमकाल. प्रवासाचा धोका पत्करू नका. वादाचा प्रसंग प्रेमाने टाळा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचा सहवास लाभेल. नवे परिचय मैत्रीपूर्ण होतील.

शुभ दिनांकः 16, 17