जूनमध्ये 42 लाख डीमॅट अकाऊंट ओपन

2024 या वर्षातील जून महिन्यात 42 लाखांहून अधिक नवीन डीमॅट अकाऊंट ओपन करण्यात आले आहेत, अशी माहिती सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीने दिली. जूनमध्ये उघडलेल्या नव्या खात्यांची संख्या 42.4 लाखांहून अधिक आहे. फेब्रुवारी 2024 नंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे. मे महिन्यात 36 लाख अकाऊंट आणि जून 2023 मध्ये 23.6 लाख डीमॅट अकाऊंट उघडण्यात आले होते. 40 लाखांहून अधिक डीमॅट खाते उघडण्याची ही चौथी वेळ आहे.