साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 23 जून ते शनिवार 29 जून 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – वरिष्ठांची मर्जी राहील
मेषेच्या चतुर्थेशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या शेवटी कलह, गैरसमज. नोकरीमध्ये बुद्धिचातुर्याने कठीण कामे करून दाखवाल. वरिष्ठांची मर्जी राहील. धंद्यात जम बसवा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच सर्वांना मान्य होतील. तणावावर मात करून इतरांची मने जिंकता येतील.
शुभ दिनांक – 23, 24

वृषभ – परिचय फायदेशीर
वृषभेच्या पराक्रमात बुध, चंद्र, मंगळ केंद्रयोग. वादाला योग्य कलाटणी देऊन वागल्यास सर्व कामे पूर्ण करता येतील. नोकरीत चातुर्याने वागा. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. धंद्यात गोड बोला. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी लोकांच्या सहवासात राहाल. ज्ञानात भर पडेल. पद, अधिकार, लोकसंग्रह वाढवा.
शुभ दिनांक – 26, 28

मिथुन – नोकरीत प्रभाव राहील
मिथुनेच्या धनेषात बुध, चंद्र, नेपच्युन युती. सप्ताहाच्या सुरुवातीला निर्णय चुकेल. सावध रहा. नम्रता ठेवा. नोकरीत प्रभाव राहील. सहकारी साहाय्य करतील. धंद्यात फायदा मिळेल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मत व्यक्त करा. वरिष्ठांच्या समवेत चर्चा सफल होतील.
शुभ दिनांक – 26, 28

कर्क – धंद्यात फसगत टाळा
स्वराशीत बुध, चंद्र, गुरू लाभयोग. उतावळेपणा, अहंकार याचा अतिरेक कुठेही सहायक ठरणार नाही. भावनेच्या आधीन न जाता प्रत्येक निर्णय घ्या. नोकरीत चूक टाळा. धंद्यात फसगत, नुकसान टाळा. खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. मोठेपणाच्या नादात कोणतेही कायद्याविरोधात कृत्य करू नका.
शुभ दिनांक – 28, 29

सिंह – प्रवासात सावध रहा
सिंहेच्या व्ययेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. परतु संयमाने वागा. प्रवासात सावध रहा. दगदग, धावपळ वाढेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. धंद्यात कष्ट होतील. लाभ होईल. कोणताही करार करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध मोडून काढता येईल. लोकांची कामे होतील. तणाव कमी होईल.
शुभ दिनांक – 23, 26

कन्या – वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा
कन्येच्या एकदशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर तणाव, चिंता, धावपळ होईल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. नोकरीत कठीण कामे हुशारीने करा. वरिष्ठ कौतुक करतील. कर्जाचे काम करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अति महत्त्वाची जबाबदारी मिळेल. योजना पूर्ण करण्यास आर्थिक साहाय्य मिळेल.
शुभ दिनांक – 28, 29

तूळ – कर्जाचे काम करा
तुळेच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे होतील. प्रवासात घाई नको. वाहनाचा कमी ठेवा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तीचा परिचय होईल. नवे मुद्दे तयार करता येतील. कौटुंबिक तणाव कमी होईल.
शुभ दिनांक – 23, 26

वृश्चिक – नोकरीत दबाव राहील
वृश्चिकेच्या भाग्येषात बुध, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. दुसऱयाच्या दबावाखाली राहून कामे करावी लागतील. परिस्थिती पाहून निर्णय घ्या. अहंकार दूर ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत दबाव राहील. प्रसंग निभावून घ्याल. धंद्यात फसगत, नुकसान टाळा. सतर्क रहा. घरातील व्यक्तीचीं मर्जी राखा. सहनशीलता ठेवा.
शुभ दिनांक – 23, 29

धनु – प्रयत्नांत सातत्य ठेवा
धनुच्या अष्टमेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यश मिळेल. प्रयत्नांत सातत्य ठेवा. तुमच्या क्षेत्रातल्या ओळखी महत्त्वाच्या ठरतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यातील कामे पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताच्या कामाला पुढे नेता येईल. वरिष्ठांना मदत करून स्वतचे मुद्दे मांडा. कौटुंबिक तणाव कमी होईल.
शुभ दिनांक – 25, 26

मकर – नोकरीत दगदग होईल
मकरेच्या सप्तमेषात बुध, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. सर्व घटना ठरविल्याप्रमाणे वेळेत, मनाप्रमाणे होतील असे समजू नका. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. रागावर ताबा ठेवा. नम्रता ठेवा. नोकरीत दगदग, तणाव, गैरसमज होईल. धंद्यात हिशेब नीट करा. वस्तू जपा. गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध, टीका होईल.
शुभ दिनांक – 28, 29

कुंभ – कामांचे नियोजन करा
कुंभेच्या षष्ठेशात बुध, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला अडचणी, अडथळे येतील पण तुमच्या कार्याला पुढे नेण्यास मदत होईल. कामे रेंगाळत ठेवू नका. मेहनत घ्या. नोकरीत प्रभाव राहील. नवीन परिचय फायदेशीर होईल. धंद्यात लक्ष द्या. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होईल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ दिनांक – 27, 28

मीन – सावधपणे काम करा
मीनेच्या पंचमेषात बुध, चंद्र, गुरू लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर तणाव, वाद होईल. डोळ्यांची काळजी घ्या. धंद्यात खर्च होईल. नोकरीत नम्रता ठेवा. सावधपणे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत करावी लागेल. तुमचे मुद्दे खोडून काढण्यात येतील. सहनशीलता ठेवा. कुणालाही कमी लेखू नका. नवीन परिचय नीट तपासून पहा.
शुभ दिनांक – 23, 24